आपलं मलठण उपक्रमांतर्गत वृक्षसंवर्धनासाठी लोकवर्गणीतून पाणी टँकर प्रदान – सौजन्य रॉक वर्ल्ड गॅलेक्सी एलएलपी व वास्तूवाण डेव्हलपर्स
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 अंतर्गत “आपलं मलठण” उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत मलठण (ता. शिरूर, जि. पुणे) येथे वृक्ष लागवड व संगोपनासाठी लोकवर्गणीतून पाणी टँकर देण्यात आला आहे. या उपक्रमासाठी रॉक वर्ल्ड गॅलेक्सी एलएलपी (श्री सागर आप्पा दंडवते) व वास्तूवाण डेव्हलपर्स (श्री सदानंद गायकवाड) यांच्या सौजन्याने टँकर उपलब्ध करून देण्यात आला असून, ग्रामविकासात त्यांचा मौल्यवान सहभाग नोंदविण्यात आला आहे.