मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “आपलं मलठण” उपक्रमाच्या श्रमदान सप्ताहाच्या बाराव्या दिवशी दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत मलठण (ता. शिरूर, जि. पुणे) येथे गाव स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत ग्रामस्थ, युवा वर्ग आणि स्वयंसेवी महिलांच्या सहभागाने गावातील विविध भागांमधील साचलेला ओला व सुका कचरा गोळा करून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. उपक्रमादरम्यान नागरिकांना स्वच्छता राखण्याचा व कचरा विभाजनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. या माध्यमातून “स्वच्छ गाव – सुंदर गाव” हे ध्येय साध्य करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संदेश या श्रमदान सप्ताहातून देण्यात आला.