आज दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी दहावा श्रमदान सप्ताहानिमित्त गावातील वृक्ष लागवड केलेल्या झाडांच्या आळ्यांतील गवत काढण्याचे सामूहिक काम श्रमदानातून करण्यात आले. या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. झाडांची योग्य वाढ व्हावी यासाठी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून गवत काढण्याचे महत्त्वाचे कार्य केले. ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक नागरिक या श्रमदानामध्ये उपस्थित होते. या उपक्रमामुळे पर्यावरण रक्षणास हातभार लागणार आहे तसेच गावाचा परिसर देखील सुंदर व हरित राहणार आहे.