पालवी पर्णकुटी बचत गटाचा ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय कंपोस्ट तयार करण्याचा उपक्रम
ग्रामपंचायत मलठण तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे पालवी पर्णकुटी बचत गटाच्या महिलांनी नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे व कंपोस्ट खतासाठी लागणारे लिक्विड तयार करणे उपक्रम केला असून सदरच्या उपक्रमातून प्रत्येक घरी ड्रम मध्ये लहान परसबाग तयार करून त्यामध्ये वांगी मिरच्या कारल्याचे वेल दोडक्याचे वेळ किंवा फुले अशा प्रकारचे कुटुंबासाठी लागणाऱ्या सेंद्रिय भाज्या पिकवता येतील जेणेकरून कुटुंबाचे आरोग्य व्यवस्थित राहील असा संदेश या उपक्रमांतर्गत गावाला देण्यात आला