मलठण । आज दिनांक 28 नोव्हेंबर २०२५ रोजी मलठण येथे रोटरी क्लब मार्फत कॅनडा येथील टीम व मान ज्यूली मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली जि प शाळां मधील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांना स्लिपिंग कीट व उपयुक्त ४५ वस्तूंचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना आनंददायी झोप येण्यासाठी फोम गादी सह व उपयुक्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
हे घेताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद न्दिगुणीत झाला. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून कॅनडा मधील ज्यूली मॅडम व त्यांची टीम आनंदित झाली. गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यांनीही अशा सामाजिक कार्याची प्रेरणा घ्यावी असा संदेश पांडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी मलठण परिसरातील १८ शाळेतील ७०० विद्यार्थ्यांना एकूण ४२ लाख रुपये किंमतीच्या साहित्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मलठण गावचे ग्रामभूषण व शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मा श्री बाळासाहेब गावडे व या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक श्री वैभव पोरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी मलठण गावच्या सरपंच सौ माधुरी ताई थोरात तसेच शिरूरचे गटविकास अधिकारी श्री महेश डोके शिरूर पंचायत समितीच्या चे विस्तार अधिकारी श्री किसन खोडदे. मलठणचे उपसरपंच श्री पोपट महाराज साळवे माजी उपसरपंच श्री दादासाहेब गावडे माजी सरपंच सौ अनुसया कदम रामचंद्र गायकवाड उपसरपंच सौ. सोनाली ताई दंडवते माजी उपसरपंच माजी चेअरमन श्री. नानाभाऊ फुलसुंदर. सुदामभाऊ गायकवाड नामदेव दंडवते., अॅड. सचिन शिंदे प्रमोद दंडवते, संदीप गायकवाड श्रीकांत वावहळ, राजू चव्हाण, चेअरमन संदीप भाऊ गायकवाड, अमोल ढोणे. मलठण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सागरआप्पा दंडवते. सामाजिक कार्यकर्ते नाना शिंदे, उद्योजक पप्पू महाले, सुरज बोडरे, उद्योजक विकास दंडवते, उद्योजक गणेश भुजबळ, सुदर्शन वाव्हळ,महाराष्ट्र पोलीस अमोल ढोणे, किरण बोडरे, किरण शिंदे,हरप्रीत बोडरे, भीमा बोडरे,प्रकाश बोडरे, कोंडीबा महाले, अनिल बोडरे, सचिन बोडरे,रोहित सुर्वे, दत्तात्रय दौंडकर, मलठण हायस्कूल च्या मुख्याध्यापक सौ.आसवले जि प मलठण शाळेचे मुख्याध्यापक मा श्री मिडगुले सर परिसरातील सर्व शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड श्री युवराज थोरात सर अध्यक्ष पुणे जिल्हा पदवीधर शिक्षक संघटना यांनी केले. शेवटी आभार मलठणच्या सरपंच माधुरीताई थोरात यांनी मानले