मलठण येथे ‘माझे अस्तित्व–शक्ती’ एकल महिला विशेष शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मलठण येथे ‘माझे अस्तित्व–शक्ती’ एकल महिला विशेष शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मलठण (ता. शिरूर) येथे महसुल मंडळ अंतर्गत माझे अस्तित्व–शक्ती एकल महिलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (दि. २७) हे शिबिर गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले. परिसरातील एकल महिलांनी शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महिला व बालविकास विभागाच्या पुढाकारातून या शिबिरात एकल महिलांसाठी शासनाच्या विविध योजना, सोयी–सुविधा, कागदपत्रांची पूर्तता आणि आरोग्यसेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. विविध महिला योजना, अनुदाने, प्रमाणपत्रे आणि आरोग्य तपासणी यासाठी महिलांची गर्दी लक्षणीय होती.

कार्यक्रमास गटविकास अधिकारी महेश डोके साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी जयराम लहामटे, विस्तार अधिकारी बाळासाहेब गावडे, बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला चोबे, कृषी अधिकारी रश्मी ओव्हाळ, ग्रामीण जीवनोन्नती विभागाच्या शिल्पा ब्राह्मणे, कवठे येमाईच्या सरपंच मनीषा भोर, मलठणच्या सरपंच माधुरी थोरात, उपसरपंच पोपट साळवे, माजी सरपंच शशिकला फुलसुंदर, पशुधन विकास अधिकारी विष्णू ठोंबरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश कट्टेमणी, आरोग्य विभाग विस्तार अधिकारी संभाजी घोडे तसेच महाराष्ट्र बँकेचे अधिकारी निलेश निकाळजे व वैभव उचाडे, परिसरातील ग्रामपंचायत अधिकारी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी कांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, लाडकी लेक योजना, दक्ष प्रशिक्षण, संजय गांधी निराधार अनुदान योजना, एकल महिला बचत गटांना बँक कर्ज पुरवठा, प्रधानमंत्री आवास योजना, दिव्यांग घरकुल योजना (एकल महिला/कुटुंबातील) व्यक्तीस घरकुल उपलब्ध करून देणे., नमुना ८ उतारे, जन्म दाखले व इतर दाखले, जातीचे दाखले, आधार अपडेट, रेशन कार्ड आधार लिंक, नवीन रेशन कार्ड काढणे, दुबार रेशन कार्ड काढणे, रेशन कार्ड नाव वाढवणे / कमी करणे., आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड वितरण, कीटकजन्य आजार रक्त नमुने तपासणी, दंतरोग तपासणी, कर्करोग पडताळणी यांसारख्या सेवा देण्यात आल्या.

एकल महिला बचत गटांना आर्थिक बळ देण्यासाठी महाराष्ट्र बँक शिरूर व मलठण शाखांमार्फत 38 लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले. महिलांनी या निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके साहेब म्हणाले,
“एकल महिलांपर्यंत शासकीय योजना आणि आरोग्यसेवा प्रभावीपणे पोहोचाव्यात, हा या शिबिराचा मूळ उद्देश आहे. सर्व आरोग्य तपासण्या मोफत असून संशयास्पद अहवाल आल्यास जिल्हा परिषद त्यांचा पाठपुरावा करणार आहे. तसेच कोणत्याही कागदपत्रात अडचण असल्यास त्वरित मदत उपलब्ध करून दिली जाईल.

या शिबिरामुळे मलठण परिसरातील महिलांसाठी शासनाचे दरवाजे अधिक सुलभरीत्या उघडले असून नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. उपस्थित महिला व अधिकारी यांच्या भोजनासाठी व्यवस्था उद्योजक सागर आप्पा दंडवते यांनी केली.

Previous यशस्वी व तेजस्वी ग्राम संघांतर्गत 15 गटांना सीआयएफ निधीचे वितरण

Leave Your Comment

ग्रामपंचायत मलठण , ता. शिरूर, जि. पुणे – 412218
सोमवार – शुक्रवार : सकाळी ९:४५ ते सायं ६:१५ वा.

शहर बातम्या आणि अद्यतने

नवीनतम ग्रामपंचायत मलठण बातम्या, लेख आणि संसाधने, दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्समध्ये पाठवली जातात.

ग्रामपंचायत मलठण © 2025. सर्व हक्क राखीव.

Translate »
मुख्यपृष्ठ
दूरध्वनी
तक्रार
कर भरणे
व्हाट्सअप