मलठण ग्रामपंचायत, ता. शिरूर, जि. पुणे – ४१२२१८ या गावाचा इतिहास राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्याही संपन्न आहे. मलठणचे जुने नाव “मल्लांचे ठाण” असे होते, कारण हे गाव एकेकाळी मल्लवीर योद्ध्यांचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध होते. या गावात ऐतिहासिक पवार घराण्याचा ३०० वर्षांपेक्षा जुना राजवाडा आजही सुंदर आणि वैभवशाली स्थितीत आहे. मलठणचे पवार घराणे राजपुत परमार वंशातून महाराष्ट्रात स्थलांतरित झाले असून, या घराण्याला शिवकालीन मराठा साम्राज्याशी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंध होता. विचारात घ्यावे तर, शंभूसिंह पवार यांचा या विभागातील जगिर होता आणि त्यांचे वंशज बाजीराव पेशवा यांच्यासमवेत उत्तर भारतातील मोहिमांमध्ये सहभागी होते. मलठण वासीय पवार घराण्याला “विश्वासराव” हा सन्मान आणि सरंजाम मिळाला होता.
गावात तटबंदी आणि चार बुरुज असलेली ऐतिहासिक गढी आजही पाहायला मिळते. गढीच्या तटबंदीवर उत्तरेला मुख्य दरवाजा आहे. गावात प्राचीन मल्लिकार्जुन शिव मंदिर आहे. राजवाड्यात लहान मंदिर, प्रशस्त विहीर, आणि ऐतिहासिक साक्ष देणारी वास्तुं आहेत. महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते. गाव शैक्षणिकदृष्ट्या अग्रगण्य असून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्राथमिक व माध्यमिक शाळांचे सुंदर इमारती आहेत. गावाच्या आसपासच्या टेकड्या पावसाळ्यात हिरव्या रंगाने नटतात.
मलठणचे अनेक रहिवासी भारतीय लष्कर, पोलिस, शासकीय व राज्यसेवा आयोग, शैक्षणिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गावाने क्रीडा क्षेत्रातही अनेक खेळाडू आणि प्रसिद्ध डॉक्टर दिले आहेत. आज मलठण महाराष्ट्रातील प्रगत ग्रामपंचायत ठरली आहे आणि आपल्या ऐतिहासिक वारशामुळे संपूर्ण परिसरात विशेष ओळख मिळवली आहे.
								कोरेगाव भिमा जवळ सन १८१८ च्या पेशवे व ब्रिटीश यांच्या झालेल्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या ४९ सैनिकांचीनावे कोरली. यामध्ये २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे आहेत. या स्तंभावर लिहिले आहे -‘One of the Triumphs of the British Army of the Earth’. महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (विशेषतः पूर्वाश्रमीचे महार), अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांनी 1 जानेवारी 1927 रोजी पहिल्यांदा विजयस्तंभाला स्वतः उपस्थित राहून अभिवादन केले होते.
								माळवा प्रांताच्या राज्यकर्त्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा काळ हा कला आणि संस्कृतीच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या कारकिर्दीत स्थापत्यकलेने विशेष योगदान दिले आहे. अहिल्याबाई यांनी अनेक धार्मिक स्थळांचे निर्माण केले. या स्थळांमध्ये मंदिरं, घाट आणि धर्मशाळा यांचा समावेश आहे, कोरेगाव भीमा येथील भीमा नदीच्या काठावरती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्थापन केलेले अहिल्येश्वराचे प्राचीन शिवालय गावाचे सौंदर्य आणखी खुलवत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे काही काळ कोरेगाव भीमा गावात वास्तव्यही होते व त्यांचा भव्यदिव्य वाडाही उभारण्यात आला. आता या वाड्याची पडझड झाली आहे.
								कोरेगाव भीमा गावात प्राचीन कोरेश्वराचे शिवालय असून, याच कोरेश्वर शिवालयामुळे गावाला कोरेगाव हे नाव पडले असे मानले जाते.
								स्वातंत्र्य संग्रामात कोरेगाव भिमातील भांडवलकर कुटूंबीयांचे फार मोठे योगदान आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजीनी भारतभर उभारलेला १९४२ च्या चलेजाव चळवळीत मोठ्या नेटाने सहभागी असणारे व स्वतः येरवडा कारागृहात जेल भोगलेले थोर स्वातंत्र्यसेनानी देशभक्त स्व. श्री. मारूती भिमाजी भांडवलकर येवढ्या मोठ्या चळवळीत आपल्या गावातील एक तरूण देशभक्तीच्या ओढीने स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होऊन प्रसंगी कारावास भोगुन देशासाठी बलिदानाची आहुती देतो. ही कोरेगाव भिमाची माती निश्चितच पवित्र असेल. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणुन तत्कालीन पंतप्रधान मा. इंदिराजी गांधी यांनी स्वातंत्र्याच्या २५ व्या वर्षानिमित्त १५ ऑगस्ट १९७२ रोजी त्यांचा भारत सरकारच्या वतीने ताम्रपत्र देऊन गौरव केला होता
नवीनतम ग्रामपंचायत कोरेगाव भिमा बातम्या, लेख आणि संसाधने, दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्समध्ये पाठवली जातात.